घरामध्ये सोनं आहे, पण ते फक्त कपाटात किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आहे का? मग या सोन्यातूनही कमाई करता येऊ शकते. सोनं न विकता त्यातून पैसे मिळवण्याची संधी गोल्ड लीजिंगच्या माध्यमातून मिळते. अगदी घर भाड्याने देऊन पैसे मिळवतो, तसंच सोनं भाड्याने देऊनही कमाई करता येते. पण या पर्यायात फायदा जितका आहे, तितकाच धोकाही आहे.
## गोल्ड लीजिंग म्हणजे नेमकं काय?
गोल्ड लीजिंग म्हणजे तुमच्याकडे असलेलं सोनं ठरावीक कालावधीसाठी सराफ किंवा ज्वेलर्सला वापरायला देणं. ज्वेलर्स या सोन्याचा वापर दागिने तयार करण्यासाठी करतात. त्याबदल्यात सोन्याच्या मालकाला ठरावीक परतावा किंवा व्याज देतात.
## फायदा आणि धोका
सोनं विकल्याशिवाय त्यातून नियमित कमाई होणे, हा या पर्यायाचा मुख्य फायदा आहे. मात्र त्यासोबत धोकेही आहेत. त्यामुळे गोल्ड लीजिंगचा पर्याय निवडण्यापूर्वी त्याचे फायदे आणि धोके नीट समजून घेणे गरजेचे आहे.
Leave a Reply