उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२७ ची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या बैठका सुरू असून आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहे. जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे.
भाजप ३४० ते ३५० जागांवर लढणार?
भाजप आपल्या सर्व मित्रपक्षांना जवळपास ५५ ते ६० जागा देण्याची शक्यता आहे. तर भाजप स्वतः ३४० ते ३५० विधानसभा जागांवर आपल्या चिन्हावर निवडणूक लढवू शकतो. मित्रपक्षांनी भाजपकडे जास्त जागांची मागणी केली आहे, त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या चार पक्षांसोबत युती
उत्तर प्रदेशमध्ये भाजपने सध्या अपना दल, राष्ट्रीय लोक दल, निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्ष या चार पक्षांसोबत युती केली आहे. या पक्षांशी जागा वाटपावर चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
Leave a Reply