सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

कोटा अपघात: ९ जण गेले, १० वर्षांचा जयेश बचावला

कोटा अपघातात धुळ्याच्या पवार कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला; पालकमंत्री जयकुमार रावल यांनी बचावलेल्या दहा वर्षीय जयेशच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

कोटा अपघात: ९ जण गेले, १० वर्षांचा जयेश बचावला

राजस्थानमधील खाटू श्याम येथे दर्शनासाठी गेलेल्या धुळे जिल्ह्यातील भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानमधील कोटा येथे झालेल्या भीषण अपघातात शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील पवार कुटुंबातील तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

कसा झाला अपघात

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात राहणारे पवार कुटुंबीय तीन वेगवेगळ्या क्रूझर वाहनांतून ३६ जणांसह गेल्या मंगळवारी देवदर्शनासाठी निघाले होते. त्यांनी उज्जैन, ओंकारेश्वर, पुष्कर, सालासर बालाजी यानंतर खाटूश्यामजी यांचे दर्शन घेतले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी उशिरा ते परतीच्या प्रवासाला निघाले.

क्रूझरमध्ये १६ प्रवासी बसले होते. ही गाडी कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभुपुरा गावाजवळ मध्यरात्री बाराच्या सुमारास पोहोचली असता, रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकली. प्राथमिक तपासात वाहनचालकाला डुलकी लागल्यामुळे क्रूझरवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असावा, असा अंदाज आहे. मृतांमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

गावावर शोककळा; पालकमंत्र्यांनी घेतली जबाबदारी

मृतदेह अमराळे गावात आणण्यात आल्यानंतर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. शोकाकुल वातावरणात सर्व मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पवार कुटुंबात दहा वर्षांचा जयेश आणि त्याचे चुलत आजोबा, असे दोघेच राहिले आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अमराळे येथे उपस्थित राहून पवार कुटुंबीयांची भेट घेतली आणि दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या दहा वर्षीय जयेशच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत त्याला भविष्यात आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. गावाने जबाबदारी घेऊन नऊ जणांचे अंत्यविधी पार पाडले, असेही रावल यांनी सांगितले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance