उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू झाली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्ष युती करून ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर सोमवारी बैठक होण्याची शक्यता आहे. ही बैठक उत्तर प्रदेशचे नेते प्रमोद तिवारी यांच्या घरी होणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसने दोन्ही पक्ष एकमेकांना सन्मानजनक जागा देतील, अशी आशा व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केले असून, लवकरात लवकर जागावाटप व्हावे, ही दोन्ही पक्षांची इच्छा आहे. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीची सत्ता यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
दिपके यांच्या पक्षाची मदत घेण्याचा विचार
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भाजपाला उत्तर प्रदेशातून दूर करण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ते अभिजीत दिपके यांच्या कॉकरोच जनता पार्टीची (सीजेपी) मदत घेण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत सीजेपीच्या प्रमुख चेहऱ्याला सहभागी करून घेण्याचा त्यांचा विचार आहे. आम आदमी पक्षाचीही मदत घेतली जाणार आहे. सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके आहेत. त्यांच्यासोबत आशुतोष रांका हाही पक्षाचा मोठा चेहरा आहे. अभिजीत दिपके उत्तर प्रदेशातील निवडणुकीत अखिलेश यादव यांना मदत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिपके यांनी भाजपाविरोधात इंडिया आघाडीला मदत केली, तर भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
२०१७ चा अनुभव आणि या निवडणुकीचे महत्त्व
२०१७ ची निवडणूक काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने एकत्र येऊन लढवली होती. त्यावेळी काँग्रेसला १०५ जागा मिळाल्या होत्या. या बैठकीला दोन्ही पक्षांतील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे की, ही निवडणूक काँग्रेसपेक्षा कितीतरी पटीने समाजवादी पक्षासाठी महत्त्वाची आहे. अखिलेश यादव यांच्यासाठीही ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्षाच्या सल्लागारांचे म्हणणे आहे की, जास्त मतदारसंघांत विजय मिळवणे आवश्यक आहे. मात्र, दोन्ही पक्षांनी एकमेकांना सन्मानजनक जागा द्यायला हव्यात. उत्तर प्रदेशातील घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply