मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना नगराध्यक्षांची बैठक होत आहे. ही बैठक एकनाथ शिंदे यांनी बोलावली असून, आज दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
आपल्या भागातील दुष्काळग्रस्त भाग, शेतकरी आणि पाणीटंचाई या विषयांचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असतील, महायुतीमधील वाद असतील आणि आपसातील मतभेद असतील, यावरही महत्त्वाची चर्चा होणार आहे.
पक्षवाढ आणि विकासकामांवर चर्चा
पक्ष कसा वाढवायचा आणि विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काय केले पाहिजे, यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. नगराध्यक्षांसोबतच्या या बैठकीला त्यामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील ताज्या घडामोडी
राज्यातील ताज्या घडामोडींमध्ये पुणे-पिंपरी चिंचवडमधील ऑटो संप, लोकसभेचे हिवाळी अधिवेशन, महाराष्ट्रातील दुष्काळ आणि हिवाळ्याचा हंगाम तसेच मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूरमधील हवामानाचा आढावा घेतला जात आहे.
Leave a Reply