दर महिन्याला मोबाईल रिचार्ज करावा लागतो, कधी तारीख लक्षात राहत नाही आणि सिम बंद पडण्याची भीती असते. अशा वापरकर्त्यांसाठी एकदाच रिचार्ज करून वर्षभर निश्चिंत राहण्याचा पर्याय उपलब्ध आहे. १,२३४ रुपयांच्या एका रिचार्जमध्ये वर्षभराची वैधता मिळते.
एकदाच रिचार्ज, वर्षभर निश्चिंत
या प्लॅनमध्ये दररोज ५०० MB हाय-स्पीड डेटा मिळतो. संपूर्ण वैधतेच्या काळात एकूण १६८ GB डेटा वापरता येतो. दररोजची डेटा मर्यादा संपल्यानंतरही ६४ kbps वेगाने इंटरनेट वापरता येते, त्यामुळे जोडणी पूर्णपणे थांबत नाही.
कॉलिंग आणि इतर फायदे
या रिचार्जमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली आहे. तसेच दर २८ दिवसांनी ३०० राष्ट्रीय MMS मिळतात. त्यामुळे मर्यादित इंटरनेट वापरणाऱ्या आणि जास्त कॉलिंग करणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.
महत्त्वाची अट : फक्त फीचर फोनसाठी
मात्र हा प्लॅन प्रत्येक मोबाईलसाठी नाही. अधिकृत माहितीनुसार हा रिचार्ज फिजिकल कीपॅड असलेल्या आणि जिओच्या 4G LTE/VoLTE नेटवर्कला सपोर्ट करणाऱ्या फीचर फोनवरच वापरता येतो. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी आपला फोन या प्लॅनसाठी पात्र आहे की नाही, हे तपासणे आवश्यक आहे.
Leave a Reply