यूट्यूब किंवा सोशल मीडियावरून कमाई करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राजस्थानातील जोधपूर येथील एका १९ वर्षीय तरुण युट्यूबरचे बचत खाते कोणतेही ठोस कारण नसताना गोठवणे भारतीय स्टेट बँकेला चांगलेच महागात पडले आहे.
विनाकारण खाते गोठवले
तरुण युट्यूबर आपल्या कमाईसाठी नियमित बचत खाते वापरत होता. बँकेने ठोस कारण न देता त्याचे खाते गोठवले, त्यामुळे त्याला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले.
ग्राहक आयोगाचा बँकेला दणका
जोधपूर जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने बँकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. आयोगाने खाते तात्काळ सुरू करण्याचे आदेश देत पीडित तरुणाला १५ हजार रुपये देण्याचेही बँकेला सांगितले आहे.
Leave a Reply