ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सूचक विधान केले आहे. मोदींच्या जीवनातील राजयोग संपल्याचे सांगत, एप्रिल महिन्यानंतर बदल दिसेल, असा दावा त्यांनी केला.
एका कार्यक्रमात बोलताना राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. दोन लाख रुपयांचा व्यवहार केला तर त्याची माहिती प्राप्तिकर विभागाला द्यावी, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. पन्नास कोटी रुपयांना आमदार-खासदार विकत घेतले तेव्हा प्राप्तिकर विभागाला कळवले होते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांसाठी ४० हजार कोटींची मागणी
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी चाळीस हजार कोटी रुपये हवेत, अशी मागणी राऊत यांनी केली. महाराष्ट्रातील बळीराजा कसा जगेल, याचा विचार करण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले.
राजयोग मंगल कार्यालयात सूचक विधान
ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला, त्या जागेचे नाव राजयोग मंगल कार्यालय असे आहे. याचाच उल्लेख करत राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या जीवनातील राजयोग संपला आहे आणि एप्रिल महिन्यानंतर हे तुम्हाला दिसेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.
Leave a Reply