लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला महिलांना दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेबाबत मंत्री नरहरी झिरवळ यांनी नांदेडमध्ये मोठे वक्तव्य केले आहे.
धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय
लाडकी बहीण योजनेमुळे धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी अवस्था झाली असल्याची कबुली झिरवळ यांनी दिली. या योजनेमुळे सध्या सरकारची कसरत सुरू असल्याचे ते म्हणाले. योजनेच्या अंमलबजावणीत सरकारसमोर अनेक आव्हाने असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले.
संकटकाळात सरकार कमी पडणार नाही
या संकटकाळात सरकार कुठेही कमी पडणार नाही, असेही झिरवळ यांनी सांगितले. योजनेचा लाभ महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply