दमदार कलाकारांची फळी आणि उत्तम निर्मितीमूल्ये असलेल्या ‘जय श्री राम’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. सेव्हन ओशन स्टुडिओज आणि अमोल कागणे स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होत आहे.
मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅप पूजन
चित्रीकरणादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्लॅपचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार हेमंत रासने, अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी तसेच पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि पुण्यातील मान्यवर उपस्थित होते.
दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी
राम खाटमोडे आणि सागर पाठक हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, विनोद वणवे हे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमोल कागणे आणि श्रेयस मोरे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. योगेश कोळी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळत आहेत. दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय क्षेत्रातील अनुभवी कलाकारांच्या सहभागामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Leave a Reply