लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ या ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले आहे. कोकणातील रत्नागिरी येथील पूर्णगड किल्ल्यावर या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.
शिवरायांचे सागरी धोरण पडद्यावर
छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शी सागरी धोरण आणि मराठी आरमाराचा पराक्रम या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवरायांच्या सागरी पराक्रमाची गाथा आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
पूर्णगडावर चित्रीकरण
कोकणातील पूर्णगड किल्ल्याच्या परिसरात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असून, या चित्रपटाकडे इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply