राजस्थानमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे राज्यातील सत्ताधारी भाजपचे टेन्शन वाढले आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसची आघाडी
जिल्हा परिषदेच्या 37 जागांपैकी काँग्रेसने 23 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपने 5 जागा जिंकल्या असून 6 जागांवर आघाडी घेतली आहे. नागौरमध्ये आरएलपीने विजय मिळवला आहे. या निकालात काँग्रेसला स्पष्ट आघाडी मिळाली आहे, तर भाजपला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडेच भाजपची सत्ता आहे. देशातील अनेक राज्यांच्या विधानभवनावर भाजपने झेंडा फडकवला आहे. राजस्थानमध्ये देखील भाजप सत्तेत असून काँग्रेस ही विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेली आहे. मात्र काल झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी भाजपचे टेन्शन वाढवले आहे.
भाजपला अपेक्षित यश नाही
स्थानिक पातळीवरील या निकालांकडे राज्याच्या राजकारणात महत्त्वाने पाहिले जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालांमध्ये काँग्रेसने अनेक ठिकाणी आघाडी घेतल्याने विरोधी पक्षाला बळ मिळाले आहे. या निकालांचा पुढील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply