सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण सुरू आहे. त्यामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. चांदीचे दरही मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. गेल्या 48 तासांमध्ये सोन्याच्या दरात प्रति तोळा तब्बल सात हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीची किंमत प्रति किलो दहा हजार रुपयांनी कमी झाली आहे.
डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि डिसेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या सरकारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे दर घसरले आहेत. सध्या सोने आणि चांदी दोन्ही वर्षभरातील सर्वांत खालच्या पातळीवर आहेत, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
जळगावात खरेदीसाठी गर्दी
सोन्याचे दर कमी झाल्याने स्वर्णनगरी जळगावमध्ये ग्राहकांनी सोने खरेदी करण्यासाठी सराफ बाजारात गर्दी केली आहे. एकीकडे दर घसरले असले तरी दुसरीकडे दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Leave a Reply