सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. २१ नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव पुन्हा खाली आला. सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे सराफा बाजारात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील आजचे दर
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख २५ हजार ५६० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १ लाख १५ हजार ९० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९४ हजार रुपये आहे. आजचा भाव कालच्या भावापेक्षा कमी असल्याचे समोर आले आहे.
उच्चांकापेक्षा ७४ हजारांनी स्वस्त
काही महिन्यांपूर्वी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम २ लाखांच्या आसपास पोहोचला होता. त्या उच्चांकाच्या तुलनेत सोने आता ७४ हजार रुपयांहून अधिक स्वस्त झाले आहे. जागतिक बाजारातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात ही घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील काही दिवसांत आणखी घसरण?
तज्ज्ञांच्या मते भारतात लवकरच सोने १ लाख रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत सोन्यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सोने खरेदी करू इच्छिणाऱ्यांचे या दरांकडे लक्ष लागले आहे.
Leave a Reply