केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) मोठा निर्णय घेतला आहे. आता जवानांना कर्तव्यावर असताना मोबाईल फोन वापरता येणार नाही. कर्तव्याच्या ठिकाणाचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
कर्तव्यावरील नवे नियम
प्रत्येक जवानाला सुरक्षा देणारे बुलेट प्रूफ जैकेट घालूनच कर्तव्यावर यावे लागणार आहे. एवढेच नाही, तर जास्त वेळ एकाच ठिकाणी थांबून ड्युटी करता येणार नाही. हे नियम आता सर्व जवानांना लागू राहणार आहेत.
सोशल मीडियावरही निर्बंध
जवान ज्या ठिकाणी कार्यरत आहेत, त्या ठिकाणाचे फोटो सोशल मीडियावर टाकता येणार नाहीत. कर्तव्याच्या ठिकाणाची माहिती किंवा छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करण्यावर बंदी असल्याने, जवानांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
Leave a Reply