लोकसभा, विधानसभा आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आपण नेहमीच पाहतो. पण नाशिकमध्ये एक अशी निवडणूक झाली, ज्यात थेट गिधाडाने बाजी मारली. एका सामाजिक संस्थेने शहराचा मानपक्षी कोण, हे ठरवण्यासाठी ही निवडणूक घेतली होती. मैदानात दोन उमेदवार होते — गिधाड काका आणि कावळोबा शेट. या दोघांसाठी एकूण ३,०३२ मतदारांनी मतदान केले.
शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला
सुरुवातीला नाशिकमध्ये कावळ्याचीच जास्त क्रेझ होती. मात्र अखेरच्या क्षणात गिधाडाने जोरदार मुसंडी मारली आणि १,९९५ मते मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवले. कावळोबाला १,०३५ मते मिळाली. गिधाडाने ९५८ मतांनी विजय मिळवला. कावळ्याला वाटले होते की विजय आपलाच आहे, पण शेवटच्या क्षणी गिधाडाने डाव पलटला.
पैशांचा पाऊस नाही, फक्त मते
राजकारण म्हटले की युत्या-आघाड्या, पैशांचा पाऊस आणि भावनांचा खेळ आला, असे मानले जाते. पण या निवडणुकीत मात्र ‘नो नोट, ओन्ली वोट’ हेच गणित होते. अत्यंत पारदर्शक लोकशाही पद्धतीने निकाल लागला. फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांनी या निवडणुकीतून काहीतरी शिकावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply