शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

महिन्यातून एकदा ही वस्तू जाळा; साप घरात येणार नाही

साप घरात येऊ नये यासाठी ग्रामीण भागात महिन्यातून एकदा बैलाचे शिंग जाळले जाते. शिंगाच्या उग्र वासामुळे साप घराजवळ येत नाही, असा तिथल्या लोकांचा समज आहे.

महिन्यातून एकदा ही वस्तू जाळा; साप घरात येणार नाही

साप म्हटलं की अनेकांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहतो. सापांबद्दल आपल्या मनात अनेक गैरसमज असतात. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे प्रत्येक साप हा विषारीच असतो, असे मानले जाते. परंतु भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, त्यातील अगदी हातच्या बोटावर मोजण्याइतक्याच प्रजाती विषारी आहेत. त्यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग अशा काही प्रजातींचा समावेश होतो. मात्र, साप कोणत्याही प्रजातीचा असो, योग्य ती काळजी घेतली गेलीच पाहिजे.

साप दिसला तर काय करावे?

तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी साप आढळून आला तर त्याला मारू नका किंवा पकडू देखील नका. कारण साप विषारी आहे की बिनविषारी हे तुम्हाला माहिती नसल्यामुळे ते तुमच्या जीवावर देखील बेतू शकते. त्याची माहिती तुम्ही तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना देऊ शकता. सर्पमित्र सापांना सुरक्षितरित्या रेस्क्यू करतात.

सापांना नेहमी आर्द्रता युक्त वातावरण आवडते. जिथे आर्द्रता जास्त आहे, अशाच ठिकाणी अनेकदा साप वास्तव्य करतात. त्यामुळे तुमच्या घरातही अशा काही जागा असतील तर तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. साप घरात घुसू नये, तसेच घरात कुठे साप लपला असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी आजही ग्रामीण भागांमध्ये काही पारंपरिक उपाय केले जातात.

महिन्यातून एकदा बैलाचे शिंग जाळण्याचा उपाय

ग्रामीण भागांमध्ये जेव्हा एखाद्या बैलाचा नैसर्गिकरित्या मृत्यू होतो, तेव्हा त्याचे शिंग व्यवस्थितरित्या जपून ठेवले जाते. ज्या घरात साप निघाला आहे, अशा घरामध्ये हे शिंग जाळले जाते. या शिंगाला उग्र असा वास असतो. या वासामुळे साप घराजवळ येत नाही, तसेच समजा घरात एखादा साप लपला असेल तर तो देखील दूर निघून जातो, असा तिथल्या लोकांचा समज आहे. आजही ग्रामीण भागांमध्ये हा उपाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच दुर्गम भागांमध्ये पाड्यावर राहणारे आदिवासी लोक देखील हा उपाय करतात.

यासोबतच साप घरात येऊ नये यासाठी घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे, गवत वाढू न देणे आणि घरात कुठेही अडचण होणार नाही याची काळजी घेणे, असे विविध उपाय आपल्याला करता येतील.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance