पंचायत समिती दिंडोरी व ग्रामपंचायत कसबे वणी यांच्यातर्फे बिरसा मुंडा यांची जयंती सप्ताह सुरू आहे. यानिमित्त खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत नवीन सिंचन विहिरींचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सन्मानपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांसाठी विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
वणी येथील खंडेराव महाराज मंदिर सभागृहात हा कार्यक्रम झाला. खासदार भास्कर भगरे अध्यक्षस्थानी होते. कसबे वणीचे सरपंच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड, गटविकास अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी भरत वेंदे, बालविकास प्रकल्प अधिकारी पंडित वाकडे, गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे, तालुका पशुधन व दुग्ध विकास अधिकारी डॉ. वायडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख, कार्यालयीन कक्ष अधिकारी नितीन दळवी आदी उपस्थित होते.
योजनांची माहिती व मार्गदर्शन
कार्यक्रमात गटांच्या सदस्यांना शिबिरांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच लघुउद्योग व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत तज्ज्ञ कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांना योजनांचा लाभ घेता येईल.
आरोग्य व पशुसंवर्धन शिबिरे
आरोग्य विभागातर्फे झालेल्या शिबिरात नागरिकांची ताप, उच्च रक्तदाब, मधुमेह यांसह विविध आजारांची तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप झाले. उत्कर्ष कोंडावर यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a Reply