गुरुवार, १९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक: ११ मतदान केंद्रे निश्चित

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे ११ मतदान केंद्रे निश्चित झाली. २६ नोव्हेंबरला २,५९६ मतदार मतदान करणार आहेत.

सोलापूर जिल्हा बँक निवडणूक: ११ मतदान केंद्रे निश्चित

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी एक याप्रमाणे एकूण ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

येत्या २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत जिल्ह्यातील २,५९६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली.

१९ पैकी १० जागा बिनविरोध

जिल्हा बँकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून हैदराबाद रोडवरील सहकार महर्षी वि. गु. शिवदारे अण्णा सभागृहात पार पडणार आहे.

तालुकानिहाय मतदान केंद्रे

अक्कलकोट येथे स्वामी समर्थ सहकारी बँकेची शाखा (ए-वन चौक), बार्शी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची शाखा (ढगे मळा), करमाळा येथे पंचायत समिती सभागृह, माळशिरस येथे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श कन्या शाळा, माढा येथे सहाय्यक निबंधक कार्यालय, मंगळवेढा येथे जिजामाता प्रशालेतील शिशुविहार (दुर्गामाता नगर, कारखाना रोड), मोहोळ येथे गटसचिव मिटिंग हॉल (बाजार समिती आवार), पंढरपूर येथे शेतकरी निवास (बाजार समिती), सांगोला येथे पंचायत समितीचे बचत भवन, उत्तर सोलापूर येथे डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह आणि दक्षिण सोलापूर येथे समाजकल्याण केंद्र (रंगभवन चौक) अशी मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance