न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांच्या वनडे मालिकेतील शानदार कामगिरीचे बक्षिस भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळाले आहे. नव्याने जाहीर झालेल्या वनडे क्रमवारीत अर्शदीप १२ क्रमांक पुढे सरकत संयुक्त रुपात १९ व्या स्थानी पोहोचला आहे.
या आठवड्यात गोलंदाजी क्रमवारीत सर्वात जास्त सुधारणा करणाऱ्या खेळाडूंमध्ये फक्त अर्शदीपचा समावेश आहे. अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान ५० षटकांच्या फॉरमेटमध्ये जगातील क्रमांक एकचा गोलंदाज म्हणून कायम आहे.
## न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही फायदा
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीही १५ क्रमांक पुढे सरकत संयुक्त रुपात १२ व्या स्थानी पोहोचला आहे, तर त्याचा सहकारी खेळाडू काइल जॅमीसन १५ क्रमांक पुढे सरकत ४५ व्या स्थानी पोहोचला आहे.
## टॉम बँटनला फलंदाजीत फायदा
इंग्लंडचा फलंदाज टॉम बँटनलाही ताज्या क्रमवारीत फायदा मिळाला आहे. त्याने एडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवून देणारे शतक ठोकले होते. बँटनने ९९ चेंडूंत १२१ धावा केल्या, जे त्याचे दुसरे वनडे शतक ठरले.
त्याच्या या खेळीच्या मदतीने इंग्लंडने मालिकेत बरोबरी केली व फलंदाजी क्रमवारीत बँटन ३४ क्रमांक पुढे सरकत आपल्या कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट १३ व्या क्रमांकावर पोहोचला.
## जो रुटचे टॉप टेनमध्ये पुनरागमन
बँटनचा सहकारी खेळाडू जो रुटचेही टॉप-१० मध्ये पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकल्यानंतर रुट दोन स्थान पुढे सरकत नवव्या स्थानी पोहोचला आहे. तसेच भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल वनडे मध्ये जगातील क्रमांक एकचा फलंदाज म्हणून कायम आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरनेही वनडे गोलंदाजीच्या टॉप-१० यादीत पुनरागमन केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यात प्रत्येकी एक विकेट घेतल्यानंतर तो चार स्थान पुढे सरकत सातव्या स्थानी पोहोचला आहे. या काळात शारजाहमध्ये झिम्बॉब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेल्या अटीतटीच्या टेस्ट सिरीजनंतर दोन्ही संघातील खेळाडूंच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
## झिम्बॉब्वेच्या मुजरबानीला फायदा
अफगाणिस्तानविरुद्धची मालिका झिम्बॉब्वेने २-० अशी आपल्या खिशात घातली. अशात टेस्ट क्रमवारीत झिम्बॉब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला याचा फायदा मिळाला आहे. त्याने दुसऱ्या व निर्णायक टेस्ट सामन्यात सहा विकेट घेतले. म्हणून त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अशाप्रकारे मुजरबानी पाच स्थान पुढे सरकत १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
तसेच फिरकीपटू ग्रीम क्रेमरही सहा स्थानाची झेप घेत ६५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजी क्रमवारीत झिम्बॉब्वेचा ओपनर इनोसेंट काइया २० क्रमांकांच्या झेपेसह ५० व्या स्थानी पोहोचला आहे, तर अनुभवी ब्रँडन टेलर ४० स्थानाच्या पुढे जात ६२ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
अफगाणिस्तानचा अष्टपैलू नसीर मारूफखिलने आपल्या टेस्ट डेब्यूत शानदार कामगिरी केली. त्याने सामन्याच्या पहिल्या डावात शतक ठोकले व सात विकेटही घेतले. पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये अशी किमया करणारा तो चौथा खेळाडू ठरला. त्यासोबतच तो कसोटी फलंदाजी क्रमवारीत १०० च्या आत म्हणजेच ९३ व्या स्थानी पोहोचला असून गोलंदाजीत संयुक्त रुपात ७८ व्या स्थानी विराजमान आहे.
Leave a Reply