सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्तासमीकरणात मोठा बदल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेनेने एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले आहे. बँकेच्या अध्यक्षपदी उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची, तर उपाध्यक्षपदी दीपक चव्हाण यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषदेतील समीकरणांचा परिणाम
या सत्तांतरामागे जिल्हा परिषदेतील राजकीय सत्तासमीकरणांचा वचपा असल्याची चर्चा आहे. जिल्ह्याच्या राजकारणात झालेल्या घडामोडींचा थेट परिणाम बँकेच्या निवडणुकीवर झाल्याचे बोलले जात आहे.
भाजपमधील गटबाजी उघड
या निकालामुळे भाजपच्या अंतर्गत गटबाजीचेही पितळ उघडे पडले असल्याची चर्चा आहे. पक्षातील अंतर्गत मतभेदांमुळे बँकेवरील पकड सुटल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
Leave a Reply