माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह चार आमदारांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने फोन करून ही धमकी दिल्याचा आरोप आहे.
खंडणी मागितली, नकार दिल्यावर धमकी
मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी फोन करून एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर धमकी देण्यात आली. तीन वर्षांपूर्वी कारेगाव येथे अशोकराव चव्हाण आणि नांदेडमधील चार आमदारांना एकाच दिवशी उडवण्याचा कट आखल्याची धमकी फोनवरून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
Leave a Reply