जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल २४१ पैकी २०० उमेदवारांनी एकाच दिवशी माघार घेतली. त्यामुळे अनेक जागांवर निवडणूक न होताच निकाल लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नेते आणि नातेवाईक बिनविरोध
या माघारीनंतर अनेक ज्येष्ठ नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच काही दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांचीही बिनविरोध निवड झाली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येने उमेदवारांनी माघार घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे.
भाजपच्या दोन दिग्गजांना अपयश
दुसरीकडे, भाजपच्या दोन ताकदवान उमेदवारांना बिनविरोध निवडून आणण्यात पक्षाला अपयश आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार मंगेश चव्हाण यांचा यात समावेश आहे. त्यामुळे या दोघांच्या जागांवर आता निवडणूक होणार असून तेथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply