सण-समारंभ, लग्नकार्य असो की सुरक्षित गुंतवणूक, सोने खरेदीकडे भारतीयांचा कल कायम असतो. सोन्यावर शुद्धतेची हमी देणारा हॉलमार्क पाहिला की ग्राहक डोळे मिटून खरेदी करतो. मात्र हॉलमार्क असलेले सोनेही बोगस असू शकते, असा धक्कादायक निष्कर्ष देशाच्या सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेच्या अहवालातून समोर आला आहे.
कॅगच्या अहवालात नेमके काय?
सोन्याच्या शुद्धतेवर देखरेख करणारी संस्था भारतीय मानक ब्यूरो आहे. या संस्थेने वर्षातून किमान एकदा सर्व नोंदणीकृत ज्वेलर्सच्या दुकानांची तपासणी करायला हवी. मात्र गेल्या पाच वर्षांत ८३ टक्के ज्वेलरी दुकानांची तपासणीच झाली नसल्याचे कॅगच्या अहवालात नमूद आहे. भारतीय मानक ब्यूरोच्या या निष्काळजीपणावर कॅगने ताशेरे ओढले आहेत.
ग्राहकांसाठी इशारा
हॉलमार्क पाहून डोळे मिटून खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी सावध राहणे गरजेचे आहे, असा इशारा या अहवालातून मिळतो. सोन्याची शुद्धता तपासल्याशिवाय खरेदी करू नये, हाच या अहवालाचा मुख्य संदेश आहे.
Leave a Reply