अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावरून रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अनेक नेत्यांनी रोहित पवार यांचा आरोप खोडून काढला आहे. आता मंत्री नितेश राणे यांनीही रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
राणे म्हणाले की, महाराष्ट्रात शरद पवार यांचा सामाजिक प्रवास पाहिला तर त्यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध आणि माणुसकी जपली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेले राजकीय आणि वैयक्तिक संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले संबंध त्यांनी कधीच राजकारणाशी जोडले नाहीत, असे राणे म्हणाले.
रोहित पवार यांनी आधी एक मफलर दाखवला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जोडले, अशी टीका राणे यांनी केली. रोहित पवार यांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनाही मागे टाकले असल्याचे ते म्हणाले.
सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
सदाभाऊ खोत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे कलियुगातील अभिमन्यू असून ते कोणत्याही चक्रव्यूहात फसणार नाहीत, असे खोत म्हणाले. अजित पवार यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला आदर आहे, असेही ते म्हणाले. पुण्यात पुतळा अनावरणाचा कार्यक्रम सुरू असताना रोहित पवार यांनी केलेले वक्तव्य योग्य नसल्याचे खोत म्हणाले. रोहित पवार यांची ही धडपड खुर्चीसाठी चाललेली केविलवाणी कूटनीती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
Leave a Reply