मंगळवार, १७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सुप्रिया सुळे: पैसे न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे जा

रोहित पवारांच्या आरोपांवर सुळे यांनी भाष्य टाळले. पाच हजार रुपये न मिळालेल्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जावे, ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत, असे त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे: पैसे न मिळाल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे जा

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत गंभीर आरोप केले जात आहेत. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात विमान कंपनीच्या मालकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याचा आरोप केला. मफलरमधील फोटो फडणवीसांचाच असल्याचा दावाही त्यांनी केला आणि फडणवीस यांचा एक फोटोही शेअर केला. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांकडून रोहित पवार यांच्यावर कडाडून टीका केली जात आहे.

सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेवर भाष्य टाळले

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यांनी रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेवर भाष्य करणे टाळले. त्याऐवजी त्यांनी पुण्यातील प्रश्नांवर भाष्य केले. ज्या लोकांच्या खात्यावर पाच हजार रुपये आले नाहीत, त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जावे, असे सुळे म्हणाल्या. ‘ते तुमच्या हक्काचे पैसे आहेत. याकरिता आम्ही पाठपुरवठा करत आहोत,’ असेही त्यांनी सांगितले.

पुण्यातील प्रश्नांवर भूमिका

फळबागांना टॅंकरची मागणी शरद पवार यांनी केली होती आणि त्यासाठी पाठपुरवठा सुरू असल्याचे सुळे यांनी सांगितले. हिंजवडी आणि पुण्यातील वाहतूक कोंडीच्या विषयात पुणे महापालिका आयुक्तांकडे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा काही दिवसांपासून रंगत होती. त्यावर सुळे यांनी यापूर्वी स्पष्टपणे सांगितले होते की, विलीनीकरणाची चर्चा सुरू होती, पण भाऊ गेल्यानंतर ती चर्चा तिथेच संपली आहे. तो विषय आपल्यासाठी तिथेच संपलेला असल्याचे त्यांनी म्हटले होते.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance