भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघाचं लक्ष आता कसोटी मालिकेकडे वळलं आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघात यावेळी दहा नव्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या संघात परतला आहे.
कसोटी मालिकेच्या तयारीमुळे नियमित कर्णधार गिल पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळू शकला नव्हता. एकदिवसीय आणि कसोटी या दोन्ही प्रकारांत तोच संघाचं नेतृत्व करतो. कसोटी संघात अशा दहा खेळाडूंची निवड झाली आहे, ज्यांना पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या संघात स्थान मिळालं नव्हतं.
कसोटी संघात दहा नवे चेहरे
केवळ कसोटी मालिका खेळणाऱ्या दहा खेळाडूंमध्ये यशस्वी जयसवाल, देवदत्त पडिक्कल, साई सुदर्शन, रवींद्र जडेजा, वाशिंगटन सुंदर, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, जसप्रीत बुमराह, आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे. कसोटी संघ असा आहे: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जयसवाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, गुरनूर बरार आणि मोहम्मद सिराज.
न्यूझीलंडचा संघ टॉम लैथमच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. त्यांच्या संघात टॉम ब्लंडेल, डेवोन कॉनवे, जैकब डफी, मैट हेनरी, काइल जैमीसन, डेरिल मिचेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सैंटनर, नाथन स्मिथ, ब्लेयर टिकनर आणि विल यंग यांचा समावेश आहे.
सामन्यांची वेळ आणि ठिकाण
पहिला कसोटी सामना गुरुवार, १९ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत वेलिंग्टनमधील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला जाईल. हा सामना न्यूझीलंडच्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता सुरू होईल, त्यामुळे भारतीय वेळेनुसार तो पहाटे ३:३० वाजता सुरू होईल. पहिल्या सत्रातील खेळ पाहायचा असेल तर भारतीय चाहत्यांना पहाटे लवकर उठावं लागेल.
मालिकेतील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल. तोही भारतीय वेळेनुसार पहाटे ३:३० वाजताच सुरू होईल.
Leave a Reply