बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

मत्स्यव्यवसायातून स्वावलंबनाची संधी; अर्ज सुरू

रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत विविध घटकांसाठी अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

मत्स्यव्यवसायातून स्वावलंबनाची संधी; अर्ज सुरू

मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास साधून नीलक्रांतीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमार बांधव, मत्स्यव्यवसाय संस्था आणि लाभार्थ्यांना विविध घटकांसाठी अनुदान मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील इच्छुक मच्छिमारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाने केले आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने ही योजना अमलात आणली आहे. यामध्ये सहा राज्यस्तरीय आणि १९ जिल्हास्तरीय योजनांचा समावेश असून, अस्तित्वातील तीन जिल्हास्तरीय योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

## योजनेंतर्गत मिळणारे अनुदान

या योजनेंतर्गत तलावांची दुरुस्ती, गाळ काढणे, नवीन मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम, अस्तित्वातील तलावांचे पॉलीथिन अस्तरीकरण, जाळी व बिगर यांत्रिक नौकांसाठी अनुदान दिले जाणार आहे. तसेच महिलांसाठी हॅण्ड ग्लोव्हज व गमबूट, फिरते मासे विक्री केंद्र, शीतपेटीसह ई-बाईक, नौकांचे यांत्रिकीकरण, जीवरक्षक उपकरणे, मासळी विक्री साहित्य, सौर सुकवणी यंत्र आणि बर्फ कारखान्यांचे आधुनिकीकरण यांचाही समावेश आहे.

## ऑनलाइन अर्जाची सुविधा

योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांनी आर्थिक स्वावलंबनासाठी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय रायगड-अलिबाग जे. एस. पटेल यांनी केले आहे.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance