सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दादांकडे दोनच शब्द होते; फडणवीसांनी सांगितला खास गुण

पुणे जिल्हा परिषदेत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणी जागवत त्यांच्या शिस्तबद्ध स्वभावाचे वर्णन केले.

दादांकडे दोनच शब्द होते; फडणवीसांनी सांगितला खास गुण

पुणे जिल्हा परिषद कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या. पुतळ्याच्या अनावरणाला जाताना मनात आनंद असतो, पण आजचा कार्यक्रम वेगळा आहे, असे ते म्हणाले. ज्यांच्याकडून संपूर्ण आयुष्य जगण्याची अपेक्षा होती, त्यांच्याकडून खूप काम झाले, पण अजूनही जास्त कामाची अपेक्षा होती. महाराष्ट्रात त्यांचे नेतृत्व बहरत असतानाच अजितदादा आपल्यातून निघून गेले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेने घेतला पुढाकार

त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांचा आनंदही आहे, पण ते आपल्यात नाहीत याचे मनस्वी दुःखही आहे, असे फडणवीस म्हणाले. अशा संमिश्र भावना मनात असताना पुणे जिल्हा परिषदेने सर्वात पहिल्यांदा पुढाकार घेऊन दादांचा अर्धाकृती पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. प्रवेशद्वाराला त्यांचे नाव दिले. त्याबद्दल त्यांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले.

जे पटले त्याला हो म्हणणार

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या दादांच्या नेतृत्वात काम करत होत्या. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असेल किंवा महाराष्ट्रातील इतर भाग, या सगळ्या भागाच्या विकासासाठी दादांनी दिलेले योगदान कधीही विसरता येऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले. दादांशिवाय तो आलेख पूर्ण होऊ शकत नाही, असेही ते म्हणाले. एक कणखर, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेला नेता, अशी त्यांची ओळख होती. कुठलीही गोष्ट थेट बोलणे राजकारणात कमी पाहायला मिळते. दादांकडे हो आणि नाही असे दोनच शब्द होते. जे पटले त्याला हो म्हणणार आणि मग ते काम करून घेण्यासाठी त्याच्या पाठिमागे उभे राहणार. जे नाही पटले ते नाही म्हणणार, अशी हिम्मत त्यांच्यात होती. केलेल्या कामांची पाहणी करणे आणि त्याची गुणवत्ता तपासणे हे काम ते स्वतः करायचे. त्यांनी स्वतःला शिस्त लावलेली होती. सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करायचे आणि आठ वाजता मंत्रालयात असायचे, असे फडणवीस यांनी सांगितले. अनेक अर्थसंकल्प मांडतानाही त्यांनी आर्थिक शिस्तीला कधीही तडा जाऊ दिला नाही. वेगवेगळ्या कामात पैसा लावताना त्याची गुणवत्ता असली पाहिजे, याकडे त्यांचा आग्रह असायचा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance