भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांचं मनापासून स्वागत केलं जातं. अतिथी देवो भवः ही भारतीय संस्कृतीची ओळख आणि जुनी परंपरा आहे. या परंपरेनुसार भारतात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा आदर केला जातो. मात्र, या आदरातिथ्याचा काही परदेशी पर्यटक गैरफायदा घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आदरातिथ्याची ओळख
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये युरोप आणि अमेरिकेतून आलेले पर्यटक भारतातील गरीब वस्त्यांना भेट देतात. आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या भागांमध्येही स्थानिक लोक परदेशी पाहुण्यांना प्रेमाने आणि आदराने वागवतात. अनेकदा अगदी छोट्या हॉटेलमधील लोकही परदेशी पाहुण्यांचं आनंदाने स्वागत करतात, त्यांना खाऊ-पिऊ घालतात आणि आपुलकीने त्यांची विचारपूस करतात.
गैरफायदा उघडकीस
या आदरातिथ्याचा फायदा घेत भारतात मोफत कसं खायचं, याचा खुलासा नेदरलँडमधील एका महिलेने केला आहे. मुंबईतील या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे. भारतीयांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला जात असल्याची चर्चा या व्हिडिओमुळे सुरू झाली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Leave a Reply