दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारतात बालदिन साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिवशी हा दिवस साजरा होतो. नेहरू यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते, म्हणूनच त्यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. आपण कितीही मोठे झालो, तरी बालपणीच्या आठवणी मनात ताज्या राहतात. उन्हाळ्याच्या सुट्ट्या, मित्रांसोबतची मस्ती आणि लहानपणी केलेली धमाल या आठवणी मनाच्या कोपऱ्यात कायम असतात.
एआयच्या मदतीने आठवणींना नवा उजाळा
आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने त्या आठवणींना पुन्हा एकदा ताजे करता येते. एआय फोटो तयार करणाऱ्या साधनांमध्ये तुमचा सध्याचा फोटो अपलोड करून योग्य सूचना दिल्यास बालपणीचा लूक असलेले खास फोटो तयार होतात. बालदिनानिमित्त असे फोटो तयार करून सोशल मीडियावर शेअर करता येतात.
एका लोकप्रिय कल्पनेत बालपणीचा फोटो आणि सध्याचा फोटो एकाच चौकटीत दाखवला जातो. एका बाजूला लहानपणीची निरागस हसरी छबी, तर दुसऱ्या बाजूला सध्याचे रूप असे दोन्ही एकत्र दिसतात. दुसऱ्या कल्पनेत एकाच व्यक्तीच्या आयुष्यातील सहा टप्पे — नवजात बाळापासून ते तिशीतल्या तरुण स्त्रीपर्यंत — सोनेरी रेषेने जोडलेले दाखवले जातात.
अशा प्रकारचे फोटो कसे तयार करायचे?
एआय फोटो साधनात तुमचा सध्याचा फोटो अपलोड करा. त्यानंतर बालपणीचा लूक तयार करण्यासाठी योग्य सूचना लिहा आणि फोटो तयार करा. काही कल्पनांमध्ये प्रौढ व्यक्ती आपल्या बालपणीच्या रूपाचा हात धरून बागेत फिरताना दाखवली जाते, तर काहींमध्ये दोन्ही रूपे एकमेकांकडे पाहून हसताना दिसतात. फोटो तयार करताना चेहऱ्याची ओळख जशीच्या तशी राहावी, याची काळजी घेण्याची सूचना दिली जाते. अशा प्रकारे बालदिनानिमित्त तुमच्या बालपणीच्या आठवणींना एक खास भेट देता येईल.
Leave a Reply