सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

अँटालियानंतर देशातील दुसरं महागडं घर; किंमत ६००० कोटी रुपये

अँटालियानंतर देशातील दुसऱ्या महागड्या घराची चर्चा सुरू आहे. मुंबईतील जेके हाऊस गौतम सिंघानिया यांच्या मालकीचं असून त्याची जुनी किंमत ६००० कोटी रुपये आहे.

अँटालियानंतर देशातील दुसरं महागडं घर; किंमत ६००० कोटी रुपये

भारतात रिअल इस्टेट मार्केट तेजीत आहे. लोकांकडून जोरदार खरेदी विक्री होत आहे. सध्या देशातील दुसऱ्या महागड्या घराची चर्चा होत आहे. अँटालिया हे भारतातील सगळ्यात महागडं घर म्हणून ओळखलं जातं. त्यानंतरच्या क्रमांकावर असलेल्या या घराची किंमत आणि त्याच्या मालकाविषयी जाणून घेऊया.

जेके हाऊस: ३० मजली इमारत

भारतातील दुसऱ्या महागड्या घराची किंमत ही ६००० कोटी रुपये इतकी आहे. हे मूल्य जुनं आहे. सध्या बाजारभावानुसार या इमारतीची किंमत वाढली आहे. मुंबईतील उच्चभ्रू भागातील या महागड्या घराचं नाव जेके हाऊस आहे. ही ३० मजली इमारत आहे. या इमारतीत सर्व सुखसुविधा उपलब्ध आहेत.

गौतम सिंघानिया यांच्या मालकीचं घर

हे महागडं घर गौतम सिंघानिया यांच्या मालकीचं आहे. हे घर मुंबईतील अल्टामाउंट रोडवर स्थित आहे. याच भागात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं देखील घर आहे. सिंघानिया यांच्या घरातील प्रत्येक मजल्यावर फुलाची बाग आणि माळी आहे. तसेच स्विमिंग पूल, हॅलिपॅड, जिम आणि मनोरंजनाच्या सुविधा आहेत. तीस मजली इमारतीत सुरुवातीच्या पाच मजल्यांवर फक्त पार्किंग आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance