एखाद्या गाण्याचा जन्म कुठे होईल, कसा होईल आणि ते गाणं कसं हिट होईल, हे कोणीही सांगू शकत नाही. अनेक चांगल्या गाण्यांचा जन्म मोठ्या स्टुडिओमध्ये नाही, तर बेडरुममध्ये किंवा अशा एखाद्या प्रसंगात झाला आहे, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. असंच एक ‘ट्रेंडिंग बेबी’ गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
उमेश कुमावत यांच्या लेखणीतून उतरलेल्या ‘ओ बेबी, यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गीताचा जन्मही असाच वेगळ्या पद्धतीने झाला आहे. हे गीत ठरवून लिहिलेलं नाही. गाडी चालवताना स्टेअरिंग हातात असताना हे गाणं सुचलं. कॉलेजच्या वयात मुलं प्रेमात पडतात. एखादी मुलगी नजरेत बसते, आवडते. ती मुलगीच आपलं आयुष्य आहे, असं त्या वयात वाटू लागतं. त्या भावना या गाण्याच्या माध्यमातून अत्यंत अचूकपणे मांडल्या आहेत.
गाण्याच्या ओळींमधून ती मुलगीच त्या मुलाचं जग आहे, हे दिसून येतं. जवळपास नऊ वर्षांपूर्वी हे गाणं सुचलेलं. त्यावेळी ‘जेन झी’ हा शब्दही कोणाच्या गावी नव्हता. पण आजच्या जेन झी पिढीला हे गाणं एकदम चपखल बसतं, असं सांगितलं जातं.
जावेद अख्तर यांचा किस्सा
संगीत आणि लेखन ही अशी दोन क्षेत्र आहेत, जिथे ठरवून एखादी चांगली कलाकृती जन्माला येत नाही. गाणं असो वा एखादा लेख, ठरवून लिहायला बसलात तर चांगले शब्द आणि चांगल्या ओळी त्यावेळी सुचतीलच, असं नाही. याचं एक उदाहरण जावेद अख्तर यांनी दिलं आहे. १९८२ साली ‘साथ साथ’ चित्रपट आला. या चित्रपटात फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर ‘तुमको देखा तो ये खयाल आया’ ही गझल चित्रित झाली होती. ही गझल जावेद अख्तर यांच्या लेखणीतून उतरली. आज या गझलला ४४ वर्षं झाली, पण तरीही ती तितकीच हिट आहे.
जावेद अख्तर यांनी या गझलचा किस्सा सांगताना म्हटलं होतं की, एके दिवशी रात्रीचे दोन वाजले होते, त्यावेळी कागद आणि पेन घेतलं आणि नऊ मिनिटांत हे गाणं उतरलं. जगजीत सिंह यांच्या आवाजातील हे गाणं आजही प्रेक्षकांना भावतं आणि जवळचं वाटतं.
कुठे ऐकता येईल?
‘ट्रेंडिंग बेबी’ हे गाणं युट्यूब, अॅपल म्युझिक, स्पॉटिफाय, अॅमेझॉन म्युझिक आणि गाना या विविध प्लॅटफॉर्मवर ऐकता येईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply