सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य न उचललेल्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अशा लाभार्थ्यांची रेशनकार्ड कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेली नसून ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आली आहेत.
नागरी पुरवठा विभागाचे संचालक जयंत जी. तारी यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. रेशनकार्ड रद्द झाल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या स्पष्टीकरणामुळे संबंधित लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कार्डधारकांसाठी दिलासा
सहा महिन्यांपासून रेशन दुकानातून धान्याची उचल न करणाऱ्या लाभार्थ्यांची कार्डे निलंबित करण्यात आली आहेत. मात्र ही कार्डे कायमस्वरूपी रद्द झालेली नाहीत, त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply