कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील चार स्वीकृत संचालकांच्या नियुक्तीवरून सुरू असलेला वाद आता अधिकच तापला आहे. या नियुक्तीवरून कोल्हापुरात संतापाचा उद्रेक झाला असून, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘संघर्ष मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
अनोख्या पद्धतीने निषेध
या मोर्चात कोल्हापूरकरांनी आपल्या अनोख्या शैलीत निषेध नोंदवला. काहींनी म्हशी, तर काहींनी रेडा आणि नांगर घेऊन रस्त्यावर उतरले. एका आंदोलकाने तर घोड्यावर बसून महायुतीविरोधात एल्गार पुकारला. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची कोल्हापूरकरांची ही पद्धत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
खंडपीठाचा निर्णय; पाटलांना धक्का
दरम्यान, संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाने सतेज पाटील यांना धक्का बसला आहे. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून सुरू असलेल्या या सत्तासंघर्षात न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवे राजकीय वळण निर्माण झाले आहे. गोकुळमधील या घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply