सोमवार, ९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

नवी मुंबईत ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू

फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने 'आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी' मोहीम सुरू केली आहे. जनजागृती सुरू आहे.

नवी मुंबईत ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम सुरू

दिवाळीचा उत्साह सर्वत्र सुरू असताना फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाने ‘आनंदी दिवाळी, सुरक्षित दिवाळी’ मोहीम राबवली आहे. अग्निशमन जवान सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांना सुरक्षिततेचे धडे देत आहेत. माहितीपत्रकांचे वाटप आणि समाजमाध्यमांद्वारेही नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना दिल्या जात आहेत.

ही मोहीम महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अग्निशमन विभागप्रमुख तथा शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. उपमुख्य अग्निशमन अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांच्यासह अग्निशमन केंद्र अधिकारी आणि जवान नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

फटाके फोडताना घ्यावयाची काळजी

फटाके फोडताना सुती कपडे वापरावेत आणि लहान मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडू द्यावेत. फटाके मोकळ्या जागेतच फोडावेत. घर, झाडे, विद्युत तारा आणि ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाके पेटविण्यासाठी लांब अगरबत्ती किंवा मेणबत्तीचा वापर करावा. खबरदारी म्हणून जवळ पाणी किंवा वाळूची बादली ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

या गोष्टी टाळा

घरामध्ये, वाहनतळात, इमारतीच्या जिन्यांत तसेच गॅस पाइपलाइन आणि विद्युत तारांजवळ फटाके फोडू नयेत. न फुटलेले फटाके पुन्हा पेटवू नयेत. रॉकेट लोकवस्ती किंवा घरांच्या दिशेने जाणार नाही, याची काळजी घ्यावी. विद्युत रोषणाई करताना ओव्हरलोडिंग टाळून प्रशिक्षित इलेक्ट्रिशियनकडूनच जोडणी करून घ्यावी, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance