दिवंगत अभिनेते धर्मेंद्र आणि दिग्गज अभिनेत्री हेमा यांची लेक ईशा देओल गेल्या काही दिवसांपासून तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळे नव्हे, तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच ईशाने भरत तख्तानी यांच्यासोबत घटस्फोट झाल्याची घोषणा केली होती. मात्र नुकत्याच झालेल्या एका दिवाळी पार्टीमध्ये ईशा आणि भरत एकत्र दिसले. दोघे फक्त एकत्र दिसले नाहीत, तर छायाचित्रकारांसमोर पोज देतानाही दिसले. त्यामुळे पुन्हा दोघांच्या नात्याची चर्चा सुरू झाली आहे.
दिवाळी पार्टीत एकत्र
शनिवार संध्याकाळी एका दिवाळी पार्टीला ईशा पोहोचली तेव्हा तिच्यासोबत भरत तख्तानीही उपस्थित होता. दोघांनी छायाचित्रकारांसमोर एकत्र उभे राहून फोटोही काढले. व्हिडीओमध्ये दोघेही हसत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहेत. ईशाने बेबी पिंक रंगाची चमकदार साडी नेसली होती, ज्यावर पांढऱ्या रंगाच्या भरतकामाची सुंदर काठ दिसत होती. तर भरत क्रीम रंगाच्या बंदगळ्याच्या पारंपरिक पोशाखात दिसला. दोघांचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर जोरात व्हायरल होत आहे. अनेकांना दोघांना एकत्र पाहून आनंद झाला, तर अनेकांनी दोघांचा नक्की घटस्फोट झाला आहे की नाही, असा प्रश्नही उपस्थित केला.
दोघांचा प्रवास
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी जून २०१२ मध्ये लग्न केले होते. दोघांचे लग्न मुंबईतील इस्कॉन मंदिरात दाक्षिणात्य पद्धतीने पार पडले होते. लग्नानंतर जवळपास पाच वर्षांनी, २०१७ मध्ये ते आई-वडील झाले. आई-वडील झाल्यानंतरही दोघांचे नाते फार काळ टिकले नाही. दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना ईशा आणि भरत यांनी समाजमाध्यमांच्या माध्यमातून विभक्त होत असल्याचा खुलासा केला. पण मुलींचा सांभाळ दोघेही जबाबदार आई-वडील म्हणून करत आहेत. घटस्फोटानंतर ईशाने नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. अभिनेत्रीने पुन्हा अभिनय विश्वात पदार्पण केले आहे. समाजमाध्यमांवरही ईशा कायम सक्रिय असते आणि तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply