बेलवंडी येथील व्यापारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना १५ टक्के दराने लाभांश वाटप, सभासद प्रशिक्षण आणि अवघ्या दहा मिनिटांत सोनेतारण कर्ज सुविधा या नवीन उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला. या संयुक्त कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष उत्तम डाके यांनी सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांनी संस्थेवर दाखवलेला विश्वास हीच संस्थेची खरी ताकद असल्याचे सांगितले.
स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेने सभासदांचे हित जोपासण्याला प्राधान्य दिले असून पारदर्शक कारभार आणि सूक्ष्म नियोजनाच्या जोरावर संस्थेची प्रगती सुरू आहे, असे डाके यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. सर्वांनी संस्थेवर ठेवलेला विश्वास सातत्याने सार्थ ठरवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
६६ लाख ४० हजार रुपयांचा लाभांश आणि नवीन सुविधा
या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सभासदांना १५ टक्के दराने तब्बल ६६ लाख ४० हजार रुपयांच्या लाभांशाचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर संस्थेच्या नवीन सोनेतारण कर्ज सुविधेचा प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे सभासदांना अवघ्या दहा मिनिटांत सोनेतारण कर्ज मिळणार आहे.
संस्था सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत आहे. सर्वसामान्य ग्रामस्थांसाठी अत्यल्प दरात रुग्णवाहिका आणि वैकुंठरथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. सभासद, ठेवीदार आणि कर्जदार यांच्या हिताचा विचार करून त्यांना विमा संरक्षणही देण्यात आले असून चालू आर्थिक वर्षात काही सभासद व कर्जदारांना विम्याचा लाभ मिळाला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच ऋषिकेश शेलार, पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, श्रीगोंदे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माउली हिरवे, दिनेश इथापे, सुभाष काळाणे, विलास राजेभोसले, विजय काळाणे, अर्जुन हिवरकर, सोपान हिरवे, युवराज पवार, मोहन आढाव, भाऊसाहेब सिनारे, उपसरपंच बाळासाहेब ढवळे, दत्तात्रय हांडे, सोपानराव लोंढे, बाळासाहेब काकडे, अंकुश गुंजाळ, नंदकुमार सुपेकर, सुनील ढवळे आणि अर्जुन कोळसे आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply