विमानाने प्रवास करायचा म्हटलं की अनेक नियम पाळावे लागतात. प्रवाशांसाठी जसे काही नियम असतात, तसेच काही नियम हवाई सुंदरींनाही पाळावे लागतात. हे नियम न पाळल्यास त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. त्यातलाच एक चर्चेचा विषय म्हणजे हवाई सुंदरी पाण्याचा ग्लास लपवून का नेतात, हा प्रश्न.
लांब प्रवासात तहान लागते
लांब पल्ल्याच्या विमान प्रवासात प्रवाशांना तहान लागणं स्वाभाविक आहे. तहान लागली की प्रवासी हवाई सुंदरींकडे पाणी मागतात. पाणी देताना हवाई सुंदरी नेहमी ग्लास लपवून ठेवते, हे अनेक प्रवाशांच्या लक्षात आलं आहे. यामागचं कारणही तितकंच व्यावहारिक आहे.
ग्लास दिसला की मागणी वाढते
पाणी दिसलं की ते पिण्याची इच्छा होते, असं मानलं जातं. पाण्याचा ग्लास दिसला की विमानातील अनेक प्रवासी एकाच वेळी पाणी मागायला लागतात. अनेक प्रवासी एकदाच पाणी मागू लागल्यास गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवासादरम्यानची शांतता बिघडू शकते आणि प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. असा अनर्थ होऊ नये म्हणून हवाई सुंदरी पाण्याचा ग्लास इतरांना दिसू नये, याची काळजी घेते.
दरम्यान, प्रवाशांना पाणी देताना ग्लास लपवावा, असा कोणताही नियम नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. आजकाल प्रवाशांना पाणी पिण्यासाठी बाटलीही दिली जात आहे. त्यामुळे ग्लास लपवणं ही नियमांची सक्ती नसून, गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठीची खबरदारी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply