लक्षणीय परकीय गुंतवणूक असूनही भारतीय शेअर बाजार गेल्या आठवड्यात तोट्यात बंद झाला. यामुळे चार आठवड्यांपासून सुरू असलेली तेजी संपुष्टात आली. निफ्टी ०.७५ टक्क्यांनी घसरून २५,६०७.२० वर बंद झाला, तर सेन्सेक्स ०.६९ टक्क्यांनी घसरून ८३,३३९.२६ वर बंद झाला. पण असं असलं तरी गेल्या आठवड्यात शेअर बाजारात घसरण झाली असली तरी पाच शेअर्सनी गुंतवणूकदारांना ६९ टक्क्यांहून अधिक परतावा दिला. चला, या शेअर्सवर एक नजर टाकूया.
बाजार घसरला असला तरी निवडक शेअर्समध्ये आठवड्याभरात लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे बाजारातील घसरणीतही या शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. या पाच शेअर्सच्या किमती आठवड्याभरात वाढत राहिल्या आणि शुक्रवारीही त्यापैकी बहुतांश शेअर्स वाढीसह बंद झाले.
सर्वाधिक परतावा देणारे शेअर्स
गेल्या आठवड्यात केसर पेट्रोप्रॉडक्ट्सचा स्टॉक टॉपवर होता, ज्याने ६९.१९ टक्के परतावा दिला. गेल्या आठवड्यात त्याचे शेअर्स १०.५५ रुपयांवरून १७.८५ रुपयांपर्यंत वाढले. शुक्रवारी त्याचे शेअर्स बीएसईवर २० टक्क्यांच्या उसळीसह १७.८५ रुपयांवर बंद झाले. या किंमतीवर कंपनीचे बाजार भांडवल १९९.३४ कोटी रुपये आहे.
बाळकृष्ण पेपर मिल्सच्या शेअरमध्ये गेल्या आठवड्यात ६२.४५ टक्क्यांची वाढ झाली. कंपनीच्या शेअरची किंमत १५.०२ रुपयांवरून २४.४० रुपयांपर्यंत वाढली. शुक्रवारी बीएसईवर कंपनीचा शेअर १८.५० टक्के वाढीसह २४.४० रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल ७८.८४ कोटी रुपये आहे.
सोनालिस कंझ्युमर प्रॉडक्ट्सचा शेअर गेल्या आठवड्यात ४१.१२ टक्क्यांनी वाढला. कंपनीचा शेअर २९.०४ रुपयांवरून ४०.९८ रुपयांपर्यंत वाढला. शुक्रवारी बीएसईवर त्याचा शेअर ७.४७ टक्क्यांच्या वाढीसह ४०.९८ रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल १९.४६ कोटी रुपये आहे.
उर्वरित शेअर्सची कामगिरी
ऑर्टिन ग्लोबल लिमिटेडचा शेअर गेल्या आठवड्यात ३२.९७ टक्क्यांनी वाढला. आठवड्यादरम्यान त्याचा शेअर १२.९८ रुपयांवरून १७.२६ रुपयांपर्यंत वाढला. शुक्रवारी बीएसईवर त्याचा शेअर १.१७ टक्क्यांच्या वाढीसह १७.२६ रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल १४.०१ कोटी रुपये आहे.
एसेक्स मरीनचा शेअर गेल्या आठवड्यात ३०.६६ टक्क्यांनी वाढला. आठवड्याभरात या कंपनीचा शेअर ३०.२३ रुपयांवरून ३९.५० रुपयांपर्यंत वाढला. शुक्रवारी बीएसईवर हा शेअर ४.६९ टक्के वाढीसह ३९.५० रुपयांवर बंद झाला. या किमतीनुसार कंपनीचे बाजार भांडवल ६०.३६ कोटी रुपये आहे.
येथे दिलेली माहिती शेअर बाजाराबद्दल आहे, गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा