लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. लग्नात मुलींना उखाणे घेण्याची जुनी परंपरा आहे. उखाणा घेताना नवरी आपल्या जोडीदाराचे नाव घेते आणि त्यातून तिच्या आनंदाचे, प्रेमाचे भाव व्यक्त होतात. लग्नाच्या सोहळ्यात उखाणे ही रंगत आणणारी परंपरा आहे.
उखाण्यांची परंपरा
लग्नामध्ये उखाणे घेण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. नवरीने घ्यायचे उखाणे सोपे, गोड आणि सहज लक्षात राहणारे असावेत, अशी अपेक्षा असते. तुम्हालाही लग्नामध्ये उखाणे घ्यायचे असतील तर पुढील पाच उखाणे तुम्ही नक्की वापरून पाहू शकता.
पाच गोड उखाणे
हिरव्या चुड्याची खणखण, गळ्यात मंगळसूत्राचा साज, … रावांचे नाव घेते, तुमच्यासाठी खास.
आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, … रावांची साथ मिळाली, हाच भाग्योदय खरा.
गुलाबाच्या फुलाचा दरवळतो सुगंध, … रावांच्या सोबतीने जुळला गोड छंद.
गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट, … रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी, … रावांचे नाव घेते साथ जन्मासाठी.
प्रतिक्रिया व्यक्त करा