, २९ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

देवदर्शनाला जाताना अपघात; कार उलटून १३ भाविकांचा मृत्यू

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू झाला. नालंदा जिल्ह्यातून राजरप्पा मंदिरात जाताना रांची-पाटणा मार्गावर रविवारी पहाटे कार उलटली. एक जण जखमी झाला आहे.

देवदर्शनाला जाताना अपघात; कार उलटून १३ भाविकांचा मृत्यू

झारखंडमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. देवदर्शनाला जात असताना या भाविकांवर काळाने घाला घातला. रामगढ जिल्ह्यातील रांची-पाटणा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे ही घटना घडली. मृतांमध्ये ४ मुलं, ४ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे. हा अपघात इतका भयंकर होता की कारचा चुराडा झाला. या अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे. अपघात नेमका कसा झाला, यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. पोलीस सध्या तपास करत आहेत.

नियंत्रण सुटल्याने कार उलटली

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे २ वाजताच्या सुमारास घडला. कुजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांकी येथे भाजप कार्यालयाजवळ हा अपघात झाला. नालंदा जिल्ह्यातील जांघारो गावातून राजरप्पाकडे एका कारमधून १४ जण प्रवास करत होते. महामार्गावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने दुसऱ्या वाहनाला धडक दिली. त्यानंतर कार महामार्गावर उलटली. या अपघातामध्ये १३ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्वजण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील रहिवासी होते. ते सर्वजण राजरप्पा मंदिरात दर्शनासाठी जात होते.

एक जण जखमी, रुग्णालयात दाखल

कारने दुसऱ्या वाहनाला इतक्या जोरात धडक दिली की कारचा चुराडा झाला. कारमध्ये असलेले अनेक जण आतमध्येच अडकले आणि त्यांनी जागीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य केले. कारचा चुराडा झाल्यामुळे मृतदेह आतमध्येच अडकले होते, त्यांना बाहेर काढणं देखील कठीण झाले होते. पोलिसांनी या सर्व मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघातामध्ये एक जण जखमी झाला असून त्यांना उपचारासाठी रामगड सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance