संसदेच्या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक पाडण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी बैठकीचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आघाडीचे दिग्गज नेते दुपारी चेन्नईत पोहोचले आणि त्यानंतर रात्री मुंबईत शरद पवार यांच्या भेटीला गेले.
चेन्नईत नेत्यांनी एम. के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत शरद पवार आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये सुमारे ४० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली.
## बैठकीत नेमकं काय घडलं?
बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागील तपशील गुलदस्त्यातच आहे. मात्र, अधिवेशनात डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर शरद पवार कोणता पत्ता उघडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
## अधिवेशनाकडे लक्ष
संसदेच्या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. इंडिया आघाडीचे नेते या विधेयकाला विरोध करण्यासाठी एकत्र येत असून, शरद पवार यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अधिवेशनातील त्यांची भूमिका आगामी राजकीय घडामोडींची दिशा ठरवणारी ठरू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा