डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी बैठकांचा सपाटा लावला असून इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एम. के. स्टॅलिन आणि शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीहून विमानाने विरोधकांनी चेन्नई गाठली आहे.
विमानात कोण कोण होते?
एका विमानात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, मीसा भारती, समाजवादी पक्षाचे दोन खासदार आणि कपिल सिब्बल होते. विरोधकांनी चेन्नई गाठल्यानंतर नेत्यांच्या बैठकीचा फोटो समोर आला आहे. या बैठकीत विरोधकांकडून एम. के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुढे काय होणार?
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे स्टॅलिन यांच्या भेटीसाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. राहुल गांधी हे डीएमकेची समजूत काढणार आहेत. या भेटीत नेमके काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा