लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून लग्नसमारंभात महिला आणि तरुणी खास साडी आणि लेहेंगा परिधान करतात. साडी किंवा लेहेंग्यामध्ये अधिक सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी त्यावर शोभणारा स्टायलिश ब्लाऊज निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. सध्या फॅशनमध्ये असलेल्या पाच हटके ब्लाऊज डिझाईन्स साडी आणि लेहेंग्यावर छान शोभून दिसतात.
बॅकलेस, पफ स्लिव्ह्ज आणि हाय-नेक
पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी ग्लॅमरस लूक हवा असेल तर बॅकलेस ब्लाऊज निवडता येतो. सिल्क, सॅटीन आणि शिफॉन साडीवर दोरी किंवा नाजूक पट्टी असलेला बॅकलेस ब्लाऊज खूप उठून दिसतो. सध्या पफ स्लिव्ह्ज ब्लाऊज मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंगमध्ये आहेत. खांद्याजवळ फुगवटा असलेली ही डिझाईन पारंपरिक आणि मॉडर्न अशा दोन्ही साड्यांवर छान दिसते. रॉयल आणि क्लासी लूक हवा असेल तर हाय-नेक ब्लाऊज निवडावा. या ब्लाऊजच्या गळ्यावर लेस, मोती किंवा नाजूक नक्षीकाम केलेले असते.
ट्रान्सपरंट हॅन्ड आणि स्क्वेअर-नेक
युनिक आणि नाजूक लूक हवा असल्यास बाह्यांसाठी नेट किंवा ऑर्गेन्झासारखे कापड वापरलेले ट्रान्सपरंट हॅन्ड ब्लाऊज उत्तम ठरतात. चौकोनी गळ्याचा म्हणजेच स्क्वेअर-नेक ब्लाऊज दिसायला साधा असला तरी अत्यंत मोहक आणि एलिगंट लूक देतो. या ब्लाऊजचा गळा चौकोनी आकाराचा असल्याने त्यावर दागिनेही खुलून दिसतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा