हिवाळा सुरू होताच अनेकांना केसगळतीची समस्या जाणवू लागते. थंडीच्या दिवसांत हवेतील आर्द्रता कमी होते, त्यामुळे टाळू कोरडी पडते आणि केसांमधील ओलावाही कमी होतो. अशा परिस्थितीत केसांची योग्य काळजी घेतली नाही, किंवा केसांवर जास्त उष्णतेचा वापर केला, तर केसांचे आणखी नुकसान होऊ शकते. टाळू कोरडी झाल्यावर त्यावर कोरडे खवले तयार होऊ लागतात आणि कोंड्याचाही धोका वाढतो. हिवाळ्यात केस का गळतात, यामागील पाच मुख्य कारणे आणि त्यावरील उपाय जाणून घेऊया.
केसगळतीमागील मुख्य कारणे
थंडीपासून बचाव करण्यासाठी हिवाळ्यात रोज गरम पाण्याने केस धुणे ही सगळ्यात सामान्य चूक आहे. गरम पाण्याने टाळू कोरडी पडते, त्यामुळे केस तुटतात आणि ठिसूळ होतात. अंघोळीसाठी कोमट पाणी वापरता येते, पण केसांसाठी मात्र कोमट पाण्याचाच वापर करावा.
हिवाळ्यात थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण स्कार्फ आणि टोप्या घालतो. मात्र, त्या सतत घातल्यामुळे केसांवर घर्षण होते. त्या काढताना केस गळू शकतात किंवा तुटू शकतात. त्यामुळे टोप्या आणि स्कार्फ घातल्यास ते वेळोवेळी काढून ठेवावेत. लोकरीच्या कपड्यांच्या घर्षणाचाही केसांवर परिणाम होतो.
केसांची काळजी कशी घ्यावी
आठवड्यातून दोन ते तीन वेळा सौम्य शाम्पूने केस धुवावेत. खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. शाम्पू लावल्यानंतर नेहमी कंडिशनर लावावे. आठवड्यातून एक ते दोन वेळा हलक्या तेलाने मालिश करता येते. ओले केस जोरात घासणे टाळावे आणि रुंद दातांचा कंगवा वापरावा. याशिवाय सकस आहार घेणे आणि तणाव कमी करणेही केसांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
(टीप – या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्यापूर्वी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा.)
प्रतिक्रिया व्यक्त करा