तीन दशकं उलटून गेली, तरी एका गाण्याची मोहिनी आजही तितकीच ताजी आहे. पावसात भिजलेली पिवळी साडी, त्यावरचा थिरकणारा डान्स आणि त्यामागची जोडी आठवली की मनात एकच गाणं उमटतं. १९९४ मध्ये आलेल्या एका चित्रपटातील हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक आवडत्या पावसाळी गाण्यांपैकी एक मानलं जातं.
पिवळ्या साडीने वेड लावलं
या गाण्यात रवीना टंडन पिवळ्या साडीत पावसात भिजत नाचली होती. तिचा तो अंदाज आणि खास डान्स स्टेप्स गाण्याची ओळख बनल्या. त्या काळात हे गाणं इतकं धाडसी वाटायचं की काही प्रेक्षक टीव्हीच बंद करायचे, असंही सांगितलं जातं. अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांची जोडी या गाण्यात प्रचंड लोकप्रिय ठरली. दोघांमधील केमिस्ट्रीने गाण्याची रंगत आणखी वाढवली आणि त्यांच्या रोमँटिक अंदाजामुळे हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं.
नव्या पिढीपर्यंत पोहोचलेलं गाणं
अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी हे गाणं गायलं आहे. आनंद बक्षी यांचे बोल आणि विजू शाह यांचं संगीत या गाण्याला लाभलं. या तिघांच्या कामामुळे गाण्याची जादू आजही कायम आहे. २०२१ मध्ये सूर्यवंशी चित्रपटासाठी या गाण्याचं नवं व्हर्जन तयार करण्यात आलं. कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्यावर ते चित्रित झालं. जुन्या गाण्याची लोकप्रियता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात या व्हर्जनचा मोठा वाटा ठरला.
प्रतिक्रिया व्यक्त करा