फूड आणि क्विक कॉमर्स कंपनी स्विगीच्या इन्स्टामार्टने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत सुमारे ३४० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले जाणार आहे. कामकाज अधिक चांगले व्हावे, यासाठी संघटनात्मक पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणत्या विभागांवर परिणाम?
कॉर्पोरेट आणि सपोर्ट विभागात ही कर्मचारी कपात केली जाणार आहे. जनरेटिव्ह एआय आणि काम करण्याची बदललेली पद्धत लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एकाच प्रकारचे काम करणाऱ्या टीमची संख्या कमी करणे, हाही यामागचा उद्देश आहे.
नव्या सीईओंच्या नेतृत्त्वात निर्णय
नंदिता सिन्हा या आता इन्स्टामार्टच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी झाल्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ ऑगस्ट रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्या मिंत्रा या फॅशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या प्रमुख होत्या. एआयमुळे भविष्यात विविध क्षेत्रांतील नोकऱ्या जातात की काय, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा