गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव सातत्याने घसरताना दिसत होते. मात्र आज जळगावच्या सराफ बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. सोने आणि चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
आजचे दर किती?
२८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जीएसटीसह १ लाख ३० हजार ८९ रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा भाव जीएसटीसह १ लाख ६२ हजार ७४० रुपये झाला आहे.
ग्राहकांसमोर प्रश्न
सोन्याचे भाव पुन्हा वाढू लागल्याने सोने आणखी महाग होते की काय, असा प्रश्न ग्राहकांसमोर उभा राहिला आहे. भारतीय संस्कृतीत सोने आणि चांदी या दोन्ही धातूंना मोठे महत्त्व आहे. गुंतवणूक असो वा हौस, भारतीय मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा