भाजप सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक सादर करणार आहे. या विधेयकावरून इंडिया आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत. एकीकडे डिलिमिटेशनला उघडपणे विरोध दर्शवला जात आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमिटेशनवरून तळ्यात मळ्यात भूमिका घेताना दिसत आहे. त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट केलं. दुसरीकडे पक्षातील खासदारांनी अद्याप निर्णय झाला नसल्याचं जाहीर केलं आहे. या विधेयकाला जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विरोध केला होता. परंतु आव्हाडांच्या कालच्या भूमिकेने नताशा यांनी भूमिका बदलली का, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली.
नताशा आव्हाड यांनी भूमिका स्पष्ट केली
या चर्चेदरम्यान नताशा आव्हाड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी सर्वांची मनापासून माफी देखील मागितली.
नताशा आव्हाड म्हणाल्या, कृपया माझ्या शांततेचा अर्थ माझी सहमती किंवा या गोष्टीतील सहभाग असा समजू नका. मला टॅग करणाऱ्या प्रत्येकाचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचलाय. मी तुमचं म्हणणं ऐकत आहे आणि तुमच्या भावना समजून घेतेय. त्याबद्दल मी मनापासून माफी मागते.
आघाडीतील मतभेद कायम
डिलिमिटेशन विधेयकावरून इंडिया आघाडीतील घटकपक्षांमध्ये वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. काही पक्ष उघडपणे विरोध करत आहेत, तर काही पक्षांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे या विधेयकावरून राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा